बेकायदेशीर बॅनर्स दिसल्यास WhatsApp वर तक्रार करा

  • शहर विद्रुपीकरण प्रतिबंधासाठी टोल फ्रि व व्हॉट्सॲप क्रमांक सुविधा

नवी मुंबई, 17 जानेवारी 2018/avirat vaatchal news:

शहरामध्ये विनापरवानगी बॅनर्स, पोस्टर्स तसेच होर्डिंग्ज लावून व भिंती रंगवून जाहिराती करु नयेत, तसेच झाडावर कोणत्याही जाहिराती लावून इजा पोहचू नये, अन्यथा संबधितांवर सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायदयातंर्गत फौजदारी कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. नागरिकांनी अनधिकृत जाहिराती / होर्डींग्ज / बॅनर्स/ पोस्टर्स आढळल्यास त्याची छायाचित्रे, अनधिकृत बांधकामाबाबतची माहिती तसेच नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कांदळवनात डेब्रीज टाकत असताना त्याची माहिती छायाचित्रे 8422955912 या मोबाईल क्रमांकावर WhatsApp व्दारे पाठवावीत, असे आवाहन नवी मुंबई महापालिकेने केले आहे.

विभाग कार्यालयनिहाय टोल फ्री क्रमांक 

  • बेलापूर विभाग कार्यालय – नोडल ऑफिसर तथा विभाग अधिकारी  शशिकांत तांडेल – 1800222312
  • नेरुळ विभाग कार्यालय – नोडल ऑफिसर तथा विभाग अधिकारी  संजय तायडे – 1800222313
  • तुर्भे विभाग कार्यालय – नोडल ऑफिसर तथा विभाग अधिकारी अंगाई साळूंखे – 1800222314
  • वाशी विभाग कार्यालय – नोडल ऑफिसर तथा विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके – 1800222315
  • कोपरखैरणे विभाग कार्यालय – नोडल ऑफिसर तथा विभाग अधिकारी  अशोक मढवी – 1800222316
  • घणसोली विभाग कार्यालय – नोडल ऑफिसर तथा विभाग अधिकारी राजेश ठाकुर – 1800222317
  • ऐरोली विभाग कार्यालय – नोडल ऑफिसर तथा विभाग अधिकारी तुषार बाबर – 1800222318
  • दिघा विभाग कार्यालय – नोडल ऑफिसर तथा विभाग अधिकारी प्रकाश वाघमारे – 1800222319
  • महापालिका मुख्यालय इमारतीत सुरू असलेले – 1800222309 व 1800222310 हे टोल फ्री क्रमांक पुर्वीप्रमाणेच कार्यरत असणार आहेत.

========================================================================================================

हिरव्या  हरभऱ्याच्या पानांची चुलीवरची गावरान भाजी