वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूला सुवर्णपदक

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला दोन पदके

अविरत वाटचाल न्यूज

मुंबई, 5 ए प्रिल 2018:

ऑस्ट्रेलियातील गोल्डक्रोस्ट इथे सुरू आलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताने एक सुवर्ण आणि एक कांस्य पदक मिळविले. वेटलिफ्टिंगमध्ये 48 किलो वजनी गटात साईखोम मीराबाई चानूने 196 किलो वजन उचलत पहिला तर पुरूषांच्या 56 किलो वजनी गटात गुरूराजने 249 किलो वजन उचलत दुसरा क्रमांक मिळविला.

या क्रीडा स्पर्धांमध्ये 19 क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामधील 14 प्रकारांमध्ये भारताचा सहभाग असणार आहे. भारताकडून या क्रीडा स्पर्धेसाठी 225 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

बॅडमिंटनमध्ये मिश्र दुहेरीच्या अ वर्गात भारताने श्रीलंकेला  हरवले. सायना नेहवाल आणि किदंही श्रीकांत यांनी एकेरी सामन्यांमध्ये विजय मिळविला. तर प्रणव जेरी चोप्रा आणि ऋत्विका गड्डे, सात्विका रांकीरेड्डी, चिराग शेट्टी, तसेच अश्विनी पोनप्पा आणि एन. सीक्वी रेड्डी या जोड्यांनी दुहेरीमध्ये भारताला श्रीलंकेविरूध्द 5-0 ने विजय मिळवून दिला.