पर्यटनस्थळ म्हणून उद्यानाचा विकास करा

  • स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव

अविरत वाटचाल न्यूज

मुंबई, 15 मे 2018:

जोसेफ बाप्टीस्टा  उद्यानामध्ये जगातील सात आर्श्यांच्या प्रतिकृती साकारण्यासोबतच महापालिका अधिकाऱ्यांनी उद्यानाचा सर्वांगिण विकास करावा. जेणेकरुन मुंबईकरांसाठी चांगले पर्यटनस्थळ म्हणून हे उद्यान  नावारुपास येईल, असे प्रतिपादन स्थायी समिती अध्यक्ष व स्थानिक नगरसेवक यशवंत जाधव यांनी केले.

जगातील सात आश्चर्यांच्या प्रतिकृतींचा समावेश नव्याने नुतनीकरण करण्यातत येणाऱ्या जोसेफ बाप्टीस्ट उद्यानामध्ये करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन स्थायी समिती अध्यक्ष नगरसेवक यशवंत जाधव यांच्याहस्‍ते व  महापालिका उप आयुक्त डॉ. किशोर क्षीरसागर (आपत्तीन व्यसवस्थावपन व उद्याने) यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ( दि.१५ मे)पार पडले.

भंडारवाडा जलाशय, माझगाव येथील जलाशयाच्या  टेकडीवर हे जोसेफ बाप्टीस्टा  उद्यान आहे. या उद्यानामध्ये जगातील सात आश्चीर्यांमध्ये ख्रिस्टरिओचा पुतळा, पिसाचा झुकता मनोरा, मेक्सीकोतील चिचेन इल्झान, आयफेल टॉवर, रोमन कोलोझि‍म, स्टॅच्यु ऑफ लिबर्टी, ताजमहल या सात आश्चर्यांच्या शिल्पाशकृतींचा समावेश करण्यात येणार आहे. त्या‍सोबतच आवश्यक असणारे फॅ‍ब्रिकेशनचे काम व पाया बांधणे, स्टेनलेस स्टीलचे कुंपण बसविणे, सूचना फलक बसविणे,  शिल्पाकृतींच्या सभोवताली रंगीत दिवाबत्ती/ रोषणाई व उद्यानवि‍षयक हिरवळ, सुशोभिकरण करणे आदी कामांचा समावेश आहे. या कामासाठी अंदाजे दीड कोटी रुपये खर्च येणार असून हे काम सहा महिन्याच्या  कालावधीत पूर्ण करण्यापचे प्रस्तावित आहे.