मलनिःसारण पाण्याच्या पुनर्वापराबाबत मुंबईत प्रदर्शन

अविरत वाटचाल न्यूज

मुंबई, 15 ऑक्टोबर 2018:

मलनिःसारण वाहिन्‍यांवर प्रक्रि‍या करुन ते पाणी पुनर्चक्रीकरणाचे सादरीकरण करणारे ‘आयफॅट इंडिया’ हे प्रदर्शन सध्या मुंबईतील

गोरेगांव येथील ‘बॉम्‍बे एक्झिबिशन सेंटर’ मध्ये सुरू आहे. जर्मनीचे वाणिज्‍य दूत डॉ. जॉर्जन मोरहार्ड यांच्‍या हस्‍ते, तर महापालिका उप आयुक्‍त (विशेष अभियांत्रिकी) राजीव कुकनूर, मेस मिनीहारचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी भूपेंद्र सिंग यांच्‍या प्रमुख उपस्थितीत आज या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

बृहन्‍मुंबई महानगरपालिका या प्रदर्शनाचे सहआयोजक असून या प्रदर्शनात एकूण २३ देशातील प्रतिनिधींनी भाग घेतला आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ या दरम्यान खुले असणा-या या पदर्शनात २३५ स्‍टॉल्‍स आहेत. मलनिःसारण वाहिन्‍यांवर प्रक्रि‍या करुन ते पाणी पुनर्चक्रीकरणाचे सादरीकरण या प्रदर्शनात करण्‍यात आले आहे. प्रगत तंत्रज्ञानाच्‍या सहाय्याने पाणी, मल, घन कचऱयाचे पुनर्चक्रीकरण, शाश्‍वत विकास, निसर्ग संवर्धन या गोष्‍टींचा समावेश आहे.

महापालिका मलनिःसारण वाहिनीद्वारे विसर्जन होणाऱया पाण्याचे पुनर्चक्रीकरण करुन पिण्‍या व्‍यतिरिक्‍त इतर बाबींसाठी त्या पाण्याचा कसा वापर करता येईल, यावर महापलिका काम करीत असल्याची  माहिती विशेष अभियांत्रिकी उप आयुक्‍त राजीव कूकनूर यांनी दिली.

======================================================================================================================================
इतर बातम्यांचाही मागोवा

नवी मुंबईतील विकास कामांबाबत महापालिका आयुक्त यांची भूमिका