गोव्यात होणार आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव

इस्रायलचे डॅन वोलमन यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करणार

अविरत वाटचाल न्यूज

7 नोव्हेंबर 2018:

49 वा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव 2018 (इफ्फी) 20 ते 28 नोव्हेंबर 2018 दरम्यान गोवा येथे होणार आहे. या महोत्सवात 68 देशांतील 212 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात 15 पैकी 3 भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय स्टार कलाकारांची भूमिका असलेला ‘द अ‍ॅस्पर्न पेपर्स’ च्या वर्ल्ड प्रीमियरसह  महोत्सवाचा प्रारंभ होईल. इस्रायलचे डॅन वोलमन यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.

विशिष्ट राज्याच्या कला आणि संस्कृतीवर प्रकाश टाकण्याच्या अनुषंगाने यावेळी एका राज्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. झारखंड राज्य यासाठी फोकस स्टेट म्हणून निवडले गेले असून 24 नोव्हेंबर हा झारखंड दिवस म्हणून या उत्सवात साजरा केला जाईल. झारखंड पॅकेजमधील चित्रपटांमध्ये  डेथ इन गंज, रांची डायरी, बेगम जान यांचा समावेश आहे.

इंगमर बर्गमन यांच्या 100 व्या वर्षांच्या वर्धापन दिनानिमित्त ‘वाइल्ड एट हार्ट मास्टर इन इन क्राफ्ट: इंगमर बर्गमन रीट्रोस्पेक्टिव्ह सेक्शन: 2018’ हा विभाग असणार आहे. त्यांचा शतकोत्तर वर्धापन दिन जगभर साजरा  होत असतांना इफ्फीतर्फे  त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम 7 चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. मेरी न्यरेरोडने दिग्दर्शित केलेल्या “बर्गमन आयलंड”  या बर्गमन यांच्यावरील  माहितीपटाला सदर विभागात समाविष्ट करण्यात आले आहे. या विभागाचे अधिकृत उद्घाटन 21  नोव्हेंबर रोजी ‘वाईल्ड स्ट्रॉबेरी’ च्या   स्क्रिनिंगनंतर पॅनेल चर्चासत्रासह होई .दरवर्षी इफ्फीत एक विभाग विशिष्ट देशावर केंद्रीत असतो, ज्या देशात सिनेमातील उत्कृष्टता आणि त्या देशाचे योगदान प्रदर्शित केले जाते.

मुंबईतील इजरायलच्या वाणिज्य दुतावासाच्या सहकार्याने दहा चित्रपटांना  कंट्री फोकस पॅकेजसाठी निवडले गेले आहेत. कंट्री फोकस सेक्शनसाठी ‘द अदर स्टोरी’ हा पहिला चित्रपट असेल. स्टीव्हन स्पीलबर्ग द्वारा  दिग्दर्शित ‘रँबो-3, ‘म्यूनिच’, रिडले स्कॉट यांचा ‘बॉडी ऑफ लाईज’ आणि ‘द डार्क नाइट राइजेज’ अशा अनेक या नामवंत हॉलीवुड चित्रपटांमध्ये काम केलेले प्रसिद्ध इस्रायली अभिनेता ऍलन आबॉर्बोल हे विशेष अतिथी म्हणून इझरायलमधील महत्वाच्या सिलेब्रिटीजसह उपस्थित राहतील. यानिमित्ताने 22 नोव्हेंबर 2018 रोजी इंडो-इझरायल सह-निर्मिती परीसंवादाचेही आयोजन करण्यात येणार आहे.

देशभरातील विविध भागांतील निर्मात्यांनी पाठविलेल्या शेकडो प्रवेशिकांमधून 26  फिचर (कथाधारित) आणि 21 नॉन-फीचर (कथाबाह्य) भारतीय चित्रपटांची निवड भारतीय पॅनोरामा ज्यूरीतर्फे करण्यात आली आहे. फीचर फिल्म ज्यूरींनी शाजी एन. करुण यांचा दिग्दर्शित चित्रपट ‘ओलू’  भारतीय पॅनोरामा 2018 विभागाची उद्घाटकीय फीचर  चित्रपट म्हणून निवडला आहे . नॉन-फीचर फिल्म जूरीने आदित्य सुहास जांभळे यांनी दिग्दर्शित केलेला ‘खर्वस’ हा चित्रपट भारतीय पॅनोरामा 2018  च्या नॉन-फीचर फिल्म  विभागाच्या उद्‌घाटनासाठी निवडला आहे. 

या महोत्सवादरम्यान ओपन एअर स्क्रिनिंग्स आयोजित केली जातात, जेथे  विस्तीर्ण जागेत एक मोठी स्क्रीन  लावली जाते. यावर्षी खेलो इंडिया ब्रँडिंगचा विस्तार म्हणून  इफ्फीमध्ये  स्पोर्टस बायोपिक प्रदर्शित केले जातील. गोल्ड, मेरी कॉम, भाग मिल्खा भाग, 1983, एमएसडीः ड अ‍नटोल्ड स्टोरी व सूरमा हे या विभागात समाविष्ट असलेले चित्रपट आहेत.

इफ्फी, इंटरनॅशनल कौन्सिल फॉर फिल्म, ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन (आयसीएफटी) पॅरिस यांच्या सहकार्याने, यूनेस्कोने मांडलेल्या आदर्शांना प्रतिबिंबित करणाऱ्‍या चित्रपटाला युनेस्को गांधी पदक व एका खास आईसीएफटी पुरस्काराद्वारे सन्मानित करते. या प्रतिष्ठित पुरस्काराने चित्रपट सन्मानित होण्यासाठी यावर्षी 10 चित्रपटांची निवड केली जाणार आहे.

दादासाहेब फाळके पुरस्कार हा देशाचा सर्वात प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कार प्राप्त करणाऱ्‍या चित्रपटांचे पुनरावलोकनही इफ्फीत प्रदर्शित करण्यात येणार आहे. यावर्षी विनोद खन्ना यांना मरणोत्तर पुरस्कार मिळाला आहे.  अचानक, लेकिन आणि अमर अकबर अँथनी या त्यांच्या काही सर्वोत्कृष्ट चित्रपटांचे प्रदर्शनही यावेळी  करण्यात येणार आहे.

=====================================================================================================================================

इतरही बातम्यांचा आढावा

तालवाद्यांमध्ये पारंगत असणारा करूणाकर रामदास पाटील