नवी मुंबईतील ‘हे’भाग 25, 31 मार्चपर्यंत बंद राहणार

कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाचा निर्णय

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 19 मार्च 2020

कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी ” नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये 31 मार्च पर्यंत महापालिका क्षेत्रातील सर्व स्पा आणि मसाज सेंटर बंद राहतील असे निर्देश महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे सर्व सलून आणि ब्युटीपार्लर हे देखील 25 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देशित केले आहे.

  • रस्त्यांवरील गर्दी टाळण्यासाठी रस्ते व फुटपाथवर होणा-या खाद्यपदार्थ आणि ज्युस विक्रीवर पुर्णत: निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे सेक्टर 11 बेलापूर येथील फुड किऑक्स आणि खाऊ गल्ली ही 31 मार्च पर्यंत बंद राहील असे घोषित करण्यात आले आहे.

 

  • नेरुळमध्ये रेल्वे स्टेशन परिसर, सेक्टर 15, सेक्टर 20 चा स्टेशन समोरील परिसर, डॉ.डी.वाय.पाटील. विद्यापीठ समोर सेक्टर 1 शिरवणे परिसर आणि एल.पी.नाका परिसरातील सर्व दुकाने व फुड स्टॉल्स 25 मार्च पर्यंत बंद करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.

 

  • सेक्टर 30 ए वाशी स्टेशन फुड किऑक्स मधील सर्व दुकाने व तेथील जागेचा वाणिज्य वापर तसेच सेक्टर 10 येथील बिकानेर खाऊ गल्ली येथील सर्व दुकाने 25 मार्च पर्यंत त्याचप्रमाणे सेक्टर 9, 9ए, 15, 16 मार्केट हे 31 मार्च पर्यंत दिवसाआड बंद राहणार आहेत.

 

  • सेक्टर 4 सानपाडा स्टेशन समोरील फुड किऑक्स मधील सर्व दुकाने व तेथील वाणिज्य वापराची जागा ते ए.पी.एम.सी. मार्केट पर्यंतचे सर्व फुड / ज्युस स्टॉल्स 25 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. त्याचबरोबर माथाडी भवन, ग्रोहितंम मार्केट, मर्चंट सेंटर, जलाराम मार्केट, मसाला मार्केट सेक्टर 19 सी, महावीर मार्केट सेक्टर 18, ओ मार्केट सेक्टर 21, जनता मार्केट सेक्टर 23, पामबीच रोडवरील ऑटोमाबाईल शॉप सेक्टर 19 सी, कॉर्पोरेट पार्क सेक्टर 18, सेक्टर 19 डी, सेक्टर 30 त्याचप्रमाणे भाजी आणि फळ मार्केट वगळता संपूर्ण ए.पी.एम.सी. मार्केट 31 मार्च पर्यंत दिवसाआड बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

  • कोपरखैरणे स्टेशन समोरील सेक्टर 5 येथील सर्व दुकाने आणि जागेचा वाणिज्य वापर 25 मार्च पर्यंत बंद करावयाचा आहे. सेक्टर 15 येथील गुलाब सन्स डेरी परिसर, सेक्टर 16 येथील फ्रेन्ड्स सर्कल एरीया, सेक्टर 14, सेक्टर 2 आणि 3 याठिकाणची दुकाने आणि जागेचा वाणिज्य वापर 31 मार्च 2020 पर्यंत बंद असणार आहे.

 

  • घणसोली स्टेशन समारील सेक्टर 3, 4 आणि 5 आणि नौसिल नाका येथील सर्व दुकाने व जागेचा वाणिज्य वापर 31 मार्च पर्यंत बंद ठेवावयाचा आहे.

 

  • ऐरोली स्टेशन (पुर्व व पश्चिम) परिसरातील सर्व दुकाने आणि जागेचा वाणिज्य वापर 25 मार्च पर्यंत त्याचप्रमाणे सेक्टर 5 येथील माऊली संकुल, सेक्टर 8 ए येथील सिडको मोकळ्या प्लॉटवरील मार्केट 31 मार्च पर्यंत दिवसाआड बंद राहणार आहे.

 

  • गर्दीव्दारे होणारा कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांच्या आरोग्य हिताच्या दृष्टीने काही वर्दळीच्या क्षेत्रातील दुकाने व जागेतील वाणिज्य वापरावर प्रतिबंध घालण्यात येत असून याबाबतची कार्यवाही संबंधित विभागांच्या सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांनी करावी असे महापालिका आयुक्तांनी निर्देशित केले आहे. याबाबत आवश्यक तेथे पोलीस विभागाचे सहकार्य देणेबाबत नवी मुंबई पोलीस आयुक्त यांनाही विनंती करण्यात आलेली आहे.

==============================================

इतर बातम्यांचाही मागोवा

एसटी प्रवासासाठी ज्येष्ठांच्या सवलत स्मार्ट-कार्डला महिनाभर मुदतवाढ
https://bit.ly/3a6wvW7

ठाणे जिल्ह्यातील आठवडी बाजार ३१ मार्चपर्यंत बंद
https://bit.ly/2QqqP1m