नवी मुंबईत पाळणाघरे, महिला सक्षमीकरण केंद्रे बंद,सभा, बैठकांवर निर्बंध 

प्रतिनिधिक फोटो

  • अविरत वाटचाल न्यूजनेटवर्क
  • नवी मुंबई, २० मार्च २०२०

कोरोना विषाणूचा (कोव्हीड – १९) प्रसार संसर्गातून होत असल्याने त्यावर प्रतिबंध आणण्याकरीता विविध उपाययोजना केल्या जात असून ज्याठिकाणी नागरिकांची गर्दी जमते अशा अनेक ठिकाणांवर प्रतिबंध आणण्यात आला आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी महापालिका क्षेत्रातील पाळणाघरे, डे केअर सेंटर, महिला सक्षमिकरण केंद्रे, स्वयंसेवी समूहांच्या सभा, तसेच महिला मंडळांची संमेलने व बैठका यांना पूर्णत: प्रतिबंध केला आहे. याबाबत आदेश काढण्यात आले असून आठही विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांना याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

लहान मुले तसेच वृध्द व्यक्ती यांनी घराबाहेर पडू नये असे निर्देशित करतानाच नागरिकांनी कुठेही गर्दी करू नये व गर्दी टाळावी तसेच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन करतानाच कोरोना विषाणूचे गांभिर्य ओळखून नागरिकांनी स्वत: च्या व इतरांच्याही आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त मिसाळ यांनी केले आहे.

================================================

  • इतर बातम्यांचाही  मागोवा