महापालिकेच्या प्रत्येक वॉर्ड आफिसमध्ये एक सचिन वाझे

 विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा आरोप

 दहिसरआर उत्तर विभाग पालिका कार्यालयावर धडक मोर्चा

  •  अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 2 सप्टेंबर 2021

राज्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर होत असुन सचिन वाझे तर केवळ हिमनगाचे  टोकन आहे,  असे अनेक वाझे मुंबई महापालिकेच्या प्रत्येक वॉर्ड ऑफिस मध्ये आहेत. सर्वसामान्य माणूस कष्ट करणार आणि तुम्ही कॅबिन मध्ये बसून त्यांच रक्त पिणार असाल तर हे चालू देणार नाही. ज्या मुंबईकरांनी ज्यांना महापालिका असो वा मुख्यमंत्रीपदी बसण्याची संधी दिली तेच आज त्याचं सर्वसामान्यांचे रक्त शोषण्याचं काम करत आहेत. सत्ताधा-यांच्या भ्रष्ट कारभारामुळे मुंबईकर जनता प्रचंड त्रस्त झाली असून ही जनताच आगामी निवडणुकीत मुंबईकर सत्ताधा-यांना धडा शिकवतील व त्यांना गाशा गुंडाळावा लागेल असा इशाराही प्रविण दरेकर यांनी दिला.

भाजपा दहिसर व मागाठाणे विधानसभा यांच्यावतीने मुंबई महानगरपालिकेच्या आर उत्तर विभाग प्रभाग कार्यालयावर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांनी महापालिकेत गैरव्यवहार होत असल्याचा आरोप केला.

Other Video On YouTube

यावेळी आ. मनीषा चौधरी, नगरसेवक हरीश छेडा, नगरसेवक जगदिश ओझा, नगरसेवक जितेंद्र पटेल,  मुंबई भाजपा उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, सचिव उत्तर मुंबई मोतीभाई देसाई, मंडळ अध्यक्ष अरविंद यादव, दिलीप उपाध्याय, वृषाली बागवे,नीलाबेन सोनी, अमर शहा इत्यादि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंत्रालयातील ३०० अधिकाऱ्यांची बदल्या केल्या आहेत. मंत्रालयातील अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात तळ ठोकून होते. ते केवळ खात्यांचे सचिव नव्हे तर कॅबिनेट सदस्यांपेक्षाही अधिक प्रभावशाली झाले असुन त्यांची बदली करण्यात आल्याचे सांगताना दरेकर म्हणाले, आता मुख्यमंत्र्यांनी जरा महापालिकेत सुद्धा  लक्ष घालावे. महापालिकेत भ्रष्टाचार होत असून आपण डोळे मिटून दूध पिणार असाल तर हे चालणार नाही. या बाबतही आपण लक्ष घालावे अशी मागणी दरेकर यांनी केली.

Other Video On YouTube

दरेकर म्हणाले, वॉर्ड ऑफिस मध्ये एक – दोन वॉर्ड ऑफिसर का राऊंड वर जातात. मग तो घाटकोपरला जाणार, कांदिवलीला जाणार की बाकी गोष्टीकडे लक्ष घालणार. बाकीचे निकृष्ट दर्जाचे आहेत का? एकाच कक्षात वर्षानुवर्षे बसलेले अधिकारी ‘पॉवरफुल्ल’ बनले आहे, त्यांना वाटेल ते करत आहे त्यामुळे आपण याकडे लक्ष घालावे. सर्वसामान्यांसाठी काम करणारे प्रामाणिक कर्तृत्ववान अधिकारी  गेले तरी कुठे ? अनेक अधिकारी असे होते ज्यांनी अनेक गोष्टींचा पर्दाफाश केला होता. परंतु आता असलेल्या अधिकाऱ्यांना पदाचा माज आला असुन भ्रष्टाचार वेसण न घालता तेच अधिकारी पदाचा गैरवापर करत भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला.

======================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप