इंदूर महानगरपालिकेचा ‘गोबरधन (जैव-सीएनजी) प्रकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या आधारे लोकार्पण

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • 19 फेब्रुवारी 2022:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंदूर महानगरपालिकेच्या ‘गोबरधन (जैव-सीएनजी) प्रकल्पाचे” दूरदृश्य प्रणालीच्या आधारे लोकार्पण केले. यावेळी मध्यप्रदेशचे राज्यपाल मधुभाई सी पटेल, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. येत्या 2 वर्षात देशातील 75 मोठ्या महानगरपालिकांमध्ये गोबर धन जैव सीएनजी प्रकल्प उभारले जातील, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली.

घराघरातील ओला कचरा तसेच कृषी आणि पशूंपासून आपल्याला मिळणारा कचरा यातून गोबर धन निर्माण केले जाते. कचऱ्यापासून गोबरधन,गोबर धनापासून स्वच्छ इंधन, स्वच्छ इंधना पासून ऊर्जा ही जीवन पोषण साखळी आहे, असे पंतप्रधान म्हणाले. देशातील शहरे अधिकाधिक स्वच्छ, प्रदूषण मुक्त आणि स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने जाण्यासाठी, हे अभियान अतिशय उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केवळ शहरातच नव्हे, तर गावात देखील गोबर धन प्रकल्प सुरु केले जात असून, त्यातून शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत मिळते आहे. या प्रकल्पामुळे, भारताची स्वच्छ ऊर्जेविषयीची कटिबद्धता साध्य करण्यास मदत तर मिळेलच, शिवाय रस्त्यावरची गुरेढोरे, अनाथ पशू यांच्या समस्येवर देखील तोडगा मिळू शकेल, असेही ते म्हणाले.

  • स्वच्छ भारत अभियानाच्या दुसऱ्या टप्पात केंद्र सरकार लाखो टन कचऱ्याचे निर्मूलन करण्यावर भर देत आहे. येत्या 2 ते 3 वर्षात या कचऱ्यांच्या ढीगांचे रूपांतरण हरित क्षेत्रांमध्ये करणार आहे, असे ते म्हणाले. एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकपासून मुक्ती मिळवण्यासाठी, देशातील 1600 पेक्षा जास्त संस्थांना आता भरपूर प्लॅस्टिक कचरा मिळतो आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
  • गोबरधन (जैव-सीएनजी) प्रकल्पाचे फायदे 
  • या प्रकल्पाची दररोज 550 टन ओल्या सेंद्रिय कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. त्यातून दररोज सुमारे 17,000 किलो सीएनजी आणि 100 टन सेंद्रिय खताचे उत्पादन अपेक्षित आहे. हा प्रकल्प शून्य लँडफिल मॉडेलवर आधारित आहे. इंदूर महानगरपालिका या प्रकल्पाद्वारे उत्पादित किमान 50% सीएनजी खरेदी करेल आणि अशा प्रकारच्या पहिल्या उपक्रमात, शहरातील 400 बस सीएनजीवर चालवल्या जातील. शिल्लक सीएनजी खुल्या बाजारात विकला जाईल. शेती आणि बागायतीसाठी रासायनिक खतांऐवजी हे सेंद्रिय खत उपयुक्त ठरेल
    —————————————————————————————–