तृतियपंथी व्यक्तींच्या कल्याणकारी योजनांबाबत कार्यशाळेचे आयोजन

10 ऑक्टोबर रोजी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 9 ऑक्टोबर 2023

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याव व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने तृतीयपंथी व्यक्तींच्या कल्याणकारी योजनांबाबतची माहिती देण्यासाठी तसेच मार्गदर्शन करण्यासाठी 10 ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सकाळी 10 वाजता ही कार्यशाळा सुरू होणार आहे.

ही बातमी वाचा : निवडणुकीचे पडघम वाजले; पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाजकल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

हा लेख वाचा : स्वच्छतेसाठी शिस्त हवी

तृतीयपंथी व्यक्तींच्या सामाजिक समस्या, नोंदणी प्रमाणपत्र व ओळखपत्र, सामाजिक आणि आर्थिक उन्नतीच्या योजना तसेच शिक्षण व रोजगार, तृतीयपंथीय व्यक्तींचे आरोग्य, पुनर्वसन आणइ कल्याणकारी योजना आणि तृतीयपंथी व्यक्तींचे मानसिक आरोग्य, सामाजिक प्रश्न, मानवी हक्क आबाधित राखण्यासाठी सार्वजनिक धोरणाद्वारे निवारण आदी मुद्द्यांवर विस्तृतपणे चर्चा या कार्यशाळेत करण्यात येणार आहे.

ही बातमी वाचा : वर्तमानपत्र गुंडाळलेले अन्नपदार्थ का खावू नये

या कार्यशाळेत तृतीयपंथी व्यक्तींच्या एकूणच प्रश्नांवर आणि त्यांच्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी डॉ. वैशाली कोल्हे, किन्नरमॉं ट्रस्टच्या सलमा खान, सारथी फाउंडेशनचे एड.पवन यादव, श्रीदेवी रासक, डॉ. चिरंजिवी भट्टाचार्य, डॉ. सोहा, प्रा.श्याम मानव,मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत- प्रभावळकर आदी मान्यवर उस्थित राहणार आहेत.

========================================================