नेरूळमध्ये महिलांनी फोडली महागाई हंडी 

कॉंग्रेसचे कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली दहीहंडीचे आयोजन

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 19 ऑगस्ट 2022

दिवसेंदिवस वाढणा-या महागाईची झळ सर्वसमान्यांना पोहोचू लागली आहे. सातत्याने वाढणा-या इंधनांच्या किंमतीमुळे गृहिणींचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. सरकारच्या या धोरणाचा निषेध  नेरूळ विभागातल्या महिलांनी एकत्र येत या वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी महागाईची हंडी फोडली. विशेष म्हणजे या हंडीत महिलांसोबत लहान मुलांनीही सहभाग होता. या महागाई हडीचे कॉंग्रेसचे कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले होते.

दहीहंडीचा उत्सव आज राज्यभरात मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. मात्र उत्सव साजरा करतानाच महागाईमुळे सर्वसमान्यांना यामध्ये बंधने येत असतात. सामान्य नागरिकाला निश्चिंत मनाने सण साजरा करता यावा याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी महिलांनी ही हंडी फोडली.

यावेळी कामगार नेते आणि नेरूळ ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रवींद्र सावंत,  नवी मुंबई जिल्हा काँग्रेस सचिव विद्या भांडेकर, कुमार यादव , सीमा वाघ , पुनम साळुंखे , रुपाली साळुंखे , सुनीता शिंदे , ज्योती औटी या महिला तर गंधर्व औटी, ध्रुव विघ्नेश माने, साळुंखे, परी पवार, तन्वी साळुंखे या लहान मुलांनी कृष्ण बनून हंडीत सहभाग घेतला.