धुळे जिल्ह्यात गुंगीच्या औषधांची चोरट्या विक्रीसाठी साठा करणारी चौकडी जेरबंद

पोलीस अधिक्षक श्रीकांत धीवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे पोलिसांची धडक कारवाई

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • धुळे, 12 डिसेंबर  2023

 

मानवी शरीरावर विपरित परिणाम करणा-या गुंगीच्या औषध आणि गोळयांची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने त्याचा बेकायदेशीररित्या साठा करणाऱ्या चौकडीला धुळे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने  धडक कारवाई करून अटक केली आहे. या चौकडीकडून १२ डिसेंबर रोजी मोठय़ा प्रमाणात गुंगीच्या औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

बातमी वाचा : राज्यात १७ ठिकाणी ‘स्वयंचलित वाहन परवाना तपासणी मार्ग- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

धुळे जिल्ह्यातील  दंडेवाला बाबा नगर मोहाडी परिसरात राहणाऱ्या आरोपी विकास उर्फ विक्की मोहन चौधरी (३६) या व्यक्तीकडे गुंगी आणणाऱ्या औषधांचा बेकायदेशीर साठा असल्याची माहिती पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून धीवरे यांनी याबाबत तातडीने कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे  आणि सहकारी बाळासाहेब सुर्यवंशी यांच्या पथकाला दिली.

बातमी वाचा : महिलांना राजकीय आरक्षणामुळे समाजात सकारात्मक बदल दिसतील- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने विकास उर्फ विक्की चौधरी याच्या घरी जावून तपास केला असता त्याच्याकडे मोठया प्रमाणात औषधांचा बेकायदेशीर साठा आढळून आला. यामध्ये codein Phosphate या प्रतिबंधीत गुंगीच्या औषधाच्या १७० बाटल्या, alprazolam गोळ्यांच्या १६० स्ट्रीप जप्त केल्या. त्याची कसून चौकशी केली असता हा औषध साठा धुळे देवपूर येथील लुकेश चौधरी (३०) याच्या रिंकु मेडीकलमधून खरेदी केल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी लुकेश चौधरीला ताब्यात घेवून अधिक चौकशी केली. तेव्हा रिंकु मेडीकलचे मालक प्रमोद येवले (३४) याच्याकडे गुंगीच्या औषधांचा साठा असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी प्रमोद येवेलाही ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याच्याकडून codein phosphate असलेल्या गुंगीच्या औषधाच्या २१० बाटल्या जप्त केल्या. प्रमोद येवले याने हा औषधांचा साठा धुळे जिल्हयातील वाडीभोकर येथे राहणाऱ्या मुकेश पाटीलकडून घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याचे गुन्हा कबूल केला.

बातमी वाचा : राज्यातील संकटात असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करा – नाना पटोले

धुळे पोलिसांच्या पथकाने या चारही जणांकडून codein Phosphate, alprazolam घटकांचा समावेश असलेल्या गुंगीच्या औषधांच्या ५८०  बाटल्या तसेच ३४० स्ट्रीप्स (५१०० गोळय़ा) असा १ लाख ३ हजार ६३० रुपये किंमतीचा बेकायदेशीर साठा केलेली औषधे जप्त केली आहेत. या प्रकरणी चारही आरोपींची अधिक चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बातमी वाचा : महिला, युवक, शेतकरी आणि गरजूंचा जगण्याचा स्तर उंचावण्यासाठी कटिबद्ध- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

ही कारवाई धुळ्याचे पोलीस अधिक्षक श्रीकांत धीवरे, अप्पर पोलीस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोसई/बाळासाहेब सुर्यवंशी, पोसई योगेश राऊत, पोसई/अमरजित मोरे, असई संजय पाटील, श्याम निकम, दिलीप खांडे, पोहवा संदिप सरगपोना/पंकज खैरमोडे, चेतन बोरसे, प्रशात चौधरी, पोकों/जितेंद्र वाघ, किशोर पाटील, योगेश जगताप, महेंद्र सपकाळ चापांकों/केलास महाजन व राजु गिते यांच्या पथकाने केली आहे. या कामगिरीबद्दल पोलीस अधिक्षक श्रीकांत धीवरे यांनी आपल्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

========================================================


========================================================