मार्कोस च्या शौर्य दिनानिमित्त बाइक रॅली

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 13 ऑगस्ट 2023

भारतीय नौदलातील स्पेशल फोर्स मरीन कमांडो म्हणजे मार्कोस कमांडो. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात या कमांडोने दहशतवाद्यांचा सामना केला होता. काश्मिर खो-यात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या मार्कोस कमांडोना श्रध्दांजली वाहण्यासाठी दरवर्षी १२ ऑगस्ट हा दिवस शौर्य दिवस म्हणून पाळला जातो. या निमित्ताने नवी मुंबईत पहिल्यांदाच मार्कोस वेटरन फाऊंडेशन यांच्यावतीने आज बाइक रॅली काढण्यात आली.

बेलापूर इथल्या महापालिका मुख्यालयापासून सुरू झालेली ही रॅली सायन पनवेल महामार्गावरून वाशी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात समाप्त करण्यात आली. यामध्ये मार्कोस कमांडो, माजी मार्कोस कमांडोसह बाइक स्वार असे ८० बाइकस्वार सहभागी झाले होते.

त्यानंतर या बाइकस्वारांनी गुजरात भवन इथं आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात रक्तदान केलं.

वाशी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोरी माटी मेरा देश या उपक्रमाच्या अंतर्गत देशभरात १ लाख ३० हजार किलोमीटर प्रवास करून दीडशे हून अधिक शहीद जवानांच्या घरची माती संग्रहित करणारे उमेश गोपीनाथ जाधव यांनी माती असलेला कलश आपल्या वाहनासह आणला होता .

हा कलश दिल्ली इथं नेण्यात येणार आहे. मार्कोस कमांडोसच्या वीर पत्नींनी हा कलश जाधव यांच्याकडे सुपूर्द केला.

========================================================

========================================================