अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 13 फेब्रुवारी 2024:

आज मी माझ्या राजकीय कारकिर्दीची नवी सुरूवात करत आहे. माझ्या 38 वर्षांच्या राजकीय प्रवासाची दिशा बदलतोय. देशाच्या आणि राज्याच्या प्रगतीमध्ये आपले योगदान असावे या भावनेतून मी भाजपात प्रवेश केला आहे. पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारून मी काम करणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

कॉंग्रेसच्या सदस्यत्वपदाचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबई इथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपा कार्यालयात हा पक्षप्रवेश करण्यात आला. चव्हाण यांच्यासोबत माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनीही पक्ष प्रवेश केला.

बातमी वाचा: प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय होणार सुपर स्पेशालिटी रुग्णालय -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कॉंग्रेस पक्ष सोडताना आपल्याला कोणावरही टिका करायची नाही. पक्षाने मला खूप काहि दिले आणि मी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले. पक्षासाठी योगदान दिले आहे. त्यामुळे पक्षाला महाराष्ट्रात ताकद मिळाली आहे असे सांगत चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कामाचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याने प्रभावीत झालो आहे. आता भाजपासाठी संपूर्ण निष्ठेने काम करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याने प्रभावीत झालो आहे. आता भाजपासाठी संपूर्ण निष्ठेने काम करणार आहे. भाजपात मी कोणत्याही पदासाठी आलो नाही पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारून मी काम करेन असे चव्हाण यावेळी म्हणाले.

——————————————————————————————————