2019 मधील निवडणुकांसाठी भाजपसोबत राहणार

रिपाइं नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

नवि दिल्ली 12 जुलै 2017/AV News Bureau:

केंद्रिय राज्यमंत्री ना . रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील  रिपब्लिकन पक्षाची भाजप ला फार मोठी मदत झाली आहे.  महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश आणि देशाच्या अन्य राज्यांमध्ये मोठी मदत झाल्याने 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांत भाजपसोबत युती करणार असल्याचे रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.

भाजपचे केंद्रीय  सरचिटणीस  राम लाल आणि रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी याबाबत आज चर्चा केली.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांची स्मारके देशभर उभी करण्याचे काम  मोदी सरकार करीत आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल आंबेडकरी जनतेत देशभर वातावरण चांगले आहे . त्यामुळे  आगामी निवडणुकांत भाजप सोबत युती करण्याबाबत रिपब्लिकन पक्ष सकारात्मक असल्याचे  मत आठवले यांनी भाजप नेते रामलाल यांच्याशी आज  झालेल्या बैठकीत  व्यक्त  केले .