घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगाराला अटक

कोपरखैरणे पोलिसांची कामगिरी, आरोपीकडून 17 तोळे दागिने जप्त

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

नवी मुंबई, 18 मार्च 2024:

घरफोडी करणा-या एका सराईत गुन्हेगाराला कोपरखैरणे पोलिसांनी (koparkhairane police) अटक केली आहे. रिजवान उस्मान खान (24 ) असे या गुन्हेगाराचे नाव असून तो मुंब्रा इथे राहणार आहे. पोलिसांच्या अधिक चौकशीदरम्यान त्याने 5 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्याच्याकडून 17 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आल्याची माहिती परिमंडळ 1 चे पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लीड स्टोरी: आर्थिक फसवणूक आणि सायबर गुन्हयांवर लक्ष

कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या खैरणे गाव इथे राहणा-या वसिम हमिद पटेल यांच्या घरात 2 फेब्रुवारी  2023 रोजी घरफोडी झाली होती. चोरट्याने घराचा कडी कोयंडा तोडून घरातील 2 लाख 70 हजार रूपयांची दागिने चोरले होते. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत मिळालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण, गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार 13 एप्रिल रोजी रिजवान याला अटक केली. त्याच्याकडून विविध 5 गुन्ह्यांमधील माल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. यामध्ये मंगळसूत्र, सोन्याची चेन, चांदीचे ताट, चांदीचे पैंजण यांचा समावेश आहे.

कारवाईत सहभागी असलेले पथक

पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे,  पोलस सह आयुक्त संजय येनपुरे, अप्पर पोलीस आयुक्त दिपक साकोरे, पोलीस उपायुक्त परि.1 पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त वाशी योगेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, पोनिरी. सुहास चव्हाण, सपोनि सागर टकले, पोउपनि मंगेश कन्नेवाड, पोहवा/योगेश डोंगरे, संतोष चिकणे, विनोद कांबळे, राकेश पाटील, मपोहवा/दिपाली पवार, पोशि/औदुंबर जाधव, राहुल डोंबाळे, किरण बुधंवत, शंकर भांगरे यांनी ही कारवाई केली.

—————————————————————————————————-