३ ऑक्टोबरला नवी मुंबईचा पाणी पुरवठा बंद

  • अविरत वाटचाल न्यूजनेटवर्क
  • नवी मुंबई, १ ऑक्टोबर २०१९

नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत 3 ऑक्टोबर रोजी मुख्य जलवाहिनी व भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथील पावसाळा नंतरची देखभाल दुरुस्तीची काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी जलवाहिनीतून होणारा पाणी पुरवठा 3 ऑक्टोबर रोजी बंद राहणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागात संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही, असे नवी मुंबई महापालिका प्रशासनाने कळविले आहे.


या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील कामोठे  नोडमधील पाणी पुरवठा देखील बंद राहणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 ऑक्टोबर रोजी कमी वेळ व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

=========================================

इतर बातम्यांचाही मागोवा