शुक्रवारी ठाण्याचा पाणी पुरवठा बंद राहणार

ठाणे, 26 एप्रिल 2017/AV News Bureau:

देखभालीच्या कामानिमित्त स्टेम प्राधिकरणाकडून ठाणे शहराला होणारा पाणी पुरवठा शुक्रवार, 28 एप्रिल, सकाळी 9 ते 29 एप्रिल, सकाळी 9 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

पाणी पुरवठा बंदच्या काळात ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून शहरात टप्याटप्याने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

  • शुक्रवारी सकाळी 9 ते रात्री 9 या काळात घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ इत्यादि परिसरात पाणी पुरवठा बंद राहील.
  • शुक्रवारी रात्री 9 ते शनिवार सकाळी 9 या काळात समतानगर, ऋतुपार्क, सिध्देवर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर व कळव्याचा काही भाग या परिसराचा पाणी पुरवठा बंद राहिल.
  • शुक्रवार 28 एप्रिल रोजी सकाळी 9 ते शनिवार, 29 एप्रिल रोजी सकाळी 9 पर्यंत (24 तास) ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.  नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.