मुंबई मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या

मुंबई, 14 जानेवारी 2017/AV News Bureau:

उद्या  रविवारी (15 जानेवारी रोजी ) होणाऱ्या मुंबई मॅरेथॉन 2017 साठी नागरिकांना उपस्थित रहाता यावे यासाठी मध्य रेल्वेने पहाटे विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण आणि पनवेल रेल्वे स्थानकातून या दोन विशेष गाड्या सोडण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेने कळविले आहे.

  • मेन लाइन

विशेष स्लो गाडी कल्याण रेल्वे स्थानकातून पहाटे वाजता सोडण्यात येणार आहे. ही गाडी पहाटे 4.30 ला सीएसटी रेल्वे स्थानकात पोहोचेल.

  • हार्बर लाईन

या मार्गावर सोडण्यात येणारी विशेष गाडी पनवेल रेल्वे स्थानकातून पहाटे 3.10 सोडण्यात येईल. ही गाडी पहाटे 4.30 ला सीएसटी रेल्वे स्थानकात पोहोचेल.