काँग्रेस स्वबळावर लढणार

 

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांची घोषणा

 मुंबई,ता.16 जानेवारी 17 / AV News Breaeu:

मुंबईत काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार आहे, केवळ जोगेंद्र कवाडे यांच्या आरपीआय पक्षाला काही जागा देणार असल्याची घोषणा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केली.

मुंबईतील सर्व नेत्यांची इच्छा आणि मत आहे की मुंबईत स्वबळावर लढावे त्यानुसार आम्ही दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना कळविले आणि त्यांनी आम्हाला अनुमती दिली आहे. त्यामुळे मुंबईत मुंबई काँग्रेस कोणाशी ही युती न करता स्वबळावर लढणार असल्याचे निरूपम यांनी सांगितले. यावेळी माजी खासदार मिलिंद देवरा, एकनाथ गायकवाड, बिहारचे आमदार अजित शर्मा, माजी आमदार चरणसिंह सपरा, युसुफ अब्राहनी, मनपा विरोधी पक्षनेता प्रविण छेडा, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील उपस्थित होते.

 18 जानेवारीला रिझर्व्ह बॅकेच्या कार्यालयांना घेराव

केंद्र सरकारने देशात लागू केलेल्या नोटाबंदीची योग्य पध्दतीने अंमलबजावणी करण्यासाठी रिझर्व्ह बॅक अपयशी ठरली आहे. याचा विरोध करण्यासाठी रिझर्व्ह बॅकेच्या देशातील 33 कार्यालयांना कॉग्रेसतर्फे घेराव घातला जाणार आहे.

 युतीविरोधात पथनाट्य

महानगरपालिका निवडणुकीत मुंबई काँग्रेसतर्फे पथनाट्याद्वारे शिवसेना व भाजपा युतीच्या काळातील भ्रष्टाचार, घोटाळे यांच्याबाबत मुंबईभर प्रचार आणि प्रसार केला जाणार आहे. मुंबईत २० जानेवारी ते १९ फेब्रुवारी पर्यंत दररोज ५ ठिकाणी हे पथनाट्य सादर करण्यात येणार आहे. हे पथनाट्य शाहिर साबळे यांचे नातू व दिग्दर्शक केदार शिंदेचे भाऊ मंदार शिंदे तयार केले आहे.