विनापरवाना व्यवसायांवर नवी मुंबई महानगरपालिकेची कारवाई

नवी मुंबई, 5 मे 2017 /AV News Bureau:

नवी मुंबई महापालिकेच्या परवाना विभागामार्फत आज वाशी विभागातील उपहारगृह व स्नॅक्स सेंटरवर धडक कारवाई करण्यात आली असून आजतागायत 354 विनापरवाना व्यवसायिकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात विनापरवाना व्यवसायांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

या सक्तीच्या कारवाई व्यतिरिक्त नागरिकांना / व्यावसायिकांना परवाने घेण्यासाठी सुलभ व पारदर्शी पर्याय उपलब्ध व्हावा म्हणून महापालिकेच्या www.nmmc.gov.in या वेबसाईटवर विविध परवाने ऑनलाईन देण्याची सुविधा ऑक्टोबर महिन्यापासून उपलब्ध करुन दिली आहे. त्या अंतर्गत आजतागायत 229 परवाने देण्यात आलेले आहेत. तसेच ऑनलाईन परवाना नुतनीकरणाची सुविधा सुध्दा महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात व्यवसाय करणा-या व्यावसायिकांनी विना परवाना व्यवसाय न करता, व्यवसाय परवाना व त्याच्या नुतनीकरणासाठी 15 मे 2017 पर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेकडे आपले अर्ज सादर करावेत व कायदेशीर कारवाईचा कटू प्रसंग टाळावा असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.