ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे

उपमहापौरपदाची माळ सेनेच्याच रमाकांत मढवी यांच्या गळ्यात

ठाणे, 6 मार्च 2017/AV News Bureau:

ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांची निवड झाली आहे. तर उपमहापौरपदाची माळही शिवसेनेच्याच रमाकांत मढवी यांच्या गळ्यात पडली आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या  उमेदवारांनी आपापले अर्ज मागे घेतले. त्यामुळे महापौरपदाची निवड बिनविरोध झाली आहे.

TANE DY MAYOR1

ठाण्याच्या महापौरपदासाठी आज निवडणूक होणार होती. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रिंगणात होते. शिवसेनेने ठाणे महापालिका निवडणुकीत 131 पैकी 67 जागा जिंकत बहुमत प्राप्त केले आहे. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर शिवसेनेचाच होणार हे निश्चित होते. परंतु भाजप आणि राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात असल्यामुळे निवडणूक होणार होती. मात्र निवडणुकीआधीच भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले त्यामुळे मीनाक्षी शिंदे आणि रमाकांत मढवी यांची अनुक्रमे महापौर आणि उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे.

रमाकांत मढवी, उपमहापौर