पावसाळ्यात बेघर करू नका

नवी मुंबईतील झोपडीवासियांचा आक्रोश

नवी मुंबई, 10जून 2017/AV News Bureau:

पावसाळा तोंडावर आलेला असतानाच सिडकोने अनधिकृत झोपड्यांवर कारवाईची मोहिम सुरू केल्यामुळे धास्तावलेल्या नवी मुंबईतील झोपडीधारकांनी घर हक्क संघर्ष समिती आणि  रिपब्लिकन सेनेच्या नेतृत्वाखाली काल सायंकाळी सिडकोवर धडक मोर्चा काढला. ऐन पावसाळ्यात आमची घरे तोडून मुलाबाळांना बेघर करू नका, असा आक्रोश या मोर्चेकऱ्यांनी केला.

नवी मुंबईतील सिडकोच्या जागेवर असणाऱ्या अनधिकृत झोपड्यांवर गेल्या काही दिवसांपासून सिडकोच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. ऐन पावसाळ्यात सिडकोने झोपड्या तोडल्यामुळे हजारो गरीब कुटुंबे उघड्यावर पडली आहे. सिडकोच्या या कारवाईविरोधात झोपडपट्टीवासियांनी रिपब्लिकन सेनेच्या नेतृत्वाखाली काल संध्याकाळी सीबीडी बेलापूर येथे मोर्चाचे आयोजन केले होते. राज्य सरकराने आदेश देवूनही सिडकोने पावसाळ्यात केलेली कारवाई अन्यायी असल्याचे रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष खाजामिया पटेल यांनी सांगितले.

मोर्चेकऱ्यांच्यावतीने सहाय्यक पोलीस आयुक्त किरण पाटील आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांना पावसाळ्यात कारवाई करू नये तसेच बेघर झालेल्या झोपडीधारकांना निवारा द्यावा,अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.

patel with police