रेल्वेने केले 2500 डब्यांचे अलगीकरण कक्षात रूपांतर

आपातकालीन परिस्थितीसाठी 40,000 खाटांची सज्जता

  • अविरत वाटचा न्यूज नेटवर्क
  • नवी दिल्ली 6 एप्रिल 2020

कोविड 19 विरोधातील लढ्यात राष्ट्रीय प्रयत्नांना पूरक म्हणून भारतीय रेल्वे सर्व शक्तीनिशी संसाधनांचा वापर करून सहकार्य करीत आहे. अल्पावधीतच, रेल्वेने 5000 डब्यांच्या रूपांतरणाच्या प्रारंभिक उद्दिष्टापैकी 2500 डब्यांचे रूपांतरण करून अर्ध्या कामाची पूर्तता केली आहे. सुमारे 2500डब्यांच्या रूपांतरणामुळे आपात्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी 40000 खाटांची सज्जता झाली आहे.

डबा रुपांतरणाच्या नमुन्याला मंजुरी मिळाल्यावर ही रुपांतरणाची प्रक्रिया रेल्वे परिमंडळांनी जलदगतीने सुरु केली.भारतीय रेल्वे दररोज सरासरी 375 डब्यांचे अलगीकरण कक्षात रूपांतर करीत आहे. देशातील 133 ठिकाणी हे रूपांतरणाचे काम सुरु आहे. अलगीकरण डबे केवळ आपात्कालीन स्थितीसाठी तयार केले जात आहेत आणि कोव्हिड -19 विरोधातील लढ्यात रोग्य मंत्रालयाच्या प्रयत्नांना बळकटी देत आहेत, असे शासनाने स्पष्ट केले.

  • इतर बातम्यांचाही मागोवा