नेरूळ येथील महापालिका सीबीएसई शाळेत नर्सरीला प्रवेश सुरू

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 21 जानेवारी 2020

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नेरुळ, सेक्टर 50  येथे  सीबीएसई बोर्डाशी संलग्न शाळा सुरु करण्यात आली आहे. सी.बी.एस.ई. बोर्डाच्या या शाळेमध्ये सन 2020-21 वर्षाकरिता नर्सरीसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. येथील प्रवेशासाठी शाळेपासून एक कि.मी. च्या आतील अंतरावर राहणा-या विदयार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. याठिकाणी प्रवेश व शिक्षण नि:शुल्क असून बस सेवा उपलब्ध असणार नाही.

प्रवेश घेण्याकरिता मुलाचे वय 30 सप्टेंबर 2020 रोजी तीन पेक्षा अधिक वर्ष पूर्ण आवश्यक असून एकूण 140 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशाप्रसंगी पाल्याचा जन्म दाखला, जातीचा दाखला, पासपोर्ट साईझ फोटो, आधारकार्ड व वडिलांचा रहिवासी पुरावा ही कागदपत्रे असणे आवश्यक आहेत. शाळेमध्ये प्रवेशअर्ज 30 जानेवारी 2020 रोजी पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 2 वा. या कालावधीत नि:शुल्क उपलब्ध असणार आहेत. पालकांनी हे अर्ज आवश्यक कागदपत्रांसह 31 जानेवारी 2020 पर्यंत शाळेत सादर करावयाचे आहेत. तरी विद्यार्थी, पालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

सुसज्ज शाळा इमारत, प्रशिक्षित शिक्षक आणि नि:शुल्क शैक्षणिक साहित्य यामुळे सी.बी.एस.ई. बोर्डात शिक्षण घेऊ इच्छिणा-या पालक, विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर पसंती या शाळेला लाभत आहे.

=====================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा