केरोसिनचे दर वाढले

मुंबई, 15  जून 2017/AV News Bureau:

मुंबई  शहर व उपनगर जिल्ह्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत 16 जूनपासून केरोसिनचे दर प्रतिलिटर 20.17 रुपये वरून 20.43 रुपये एवढे वाढविण्यात आले आहेत.

केरोसिनचा सध्याचा एक्स डेपो दर 17 हजार 784 रुपये प्रति किलो लिटर वरून तो 18 हजार 34 रुपये प्रति किलो लिटर असा करण्यात आला आहे. शासनाने केरोसिनच्या वाहतूकीसाठी येणाऱ्या केवळ डिझेल वरील खर्चात झालेली वाढ मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र शासनाने 1 एप्रिल  ते 31 जुलै, 2017 मधील प्रत्येक पंधरवाड्यानंतर केरोसिनच्या एक्स डेपो दरात प्रति लिटर 25 पैसे याप्रमाणे प्रति किलो लिटर 250 रुपये(अधिक मुल्यवर्धित कर) इतकी वाढ करुन अनुदानित केरोसीनचा किरकोळ विक्री दर निश्चित केला असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा विभागाने दिली आहे.