पाऊस आला धावून

  • ऑक्टोबर हीट आणि लोडशेडींगमुळे त्रस्त नवी मुंबईकरांना पावसाचा दिलासा

नवी मुबई, 6 ऑक्टोबर 2017/AV News Bureau:

गेल्या दोन तीन दिवसांपासून लोडशेडींगने त्रस्त झालेल्या नागरिकांच्या मदतीला पाऊस धावून आला आहे. गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याच्या साथीने नवी मुंबई परिसरात पावसाच्या जोरदार धारा कोसळू लागल्यामुळे वातावरणातील उकाडा नाहीसा झाला आणि हवेत छानसा गारवा पसरला. या पावसाने  ऑक्टोबर हीट आणि लोडशेडींगमुळे त्रस्त नवी मुंबईकरांना चागलांच दिलासा दिला आहे. loadsheding and rain

ऑक्टोबर हीटमुळे मुंबई आणि उपनगरातील तापमान सुमारे   35 अंशापर्यंत वाढले होते. वातावरणातील उकाड्यामुळे वीजेची मागणी वाढली. आज राज्यातील विजेची मागणी 17 हजार 800 मेगावॅट इतकी होती. मात्र 15 हजार 700 मेगवॅट इतकीच वीज उपलब्ध झाली. मागणीच्या तुलनेत विजेची पुरवठा होवू न शकल्यामुळे लोडशेडींगचा सामना करावा लागत आहे.  अखेर लोडशेडींगने त्रस्त नागरिकांना  निसर्गानेच हात दिला. दुपारनंतर वातावरण ढगाळ दिसू लागले. सर्वत्र अंधार दाटून आला आणि  काही वेळातच अचनाक विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे ऑक्टोबर हीट आणि लोडशेडींगमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, पाऊस पुढील काही दिवस असाच पडू लागला तर सध्या सुरू असलेले लोडशेडींग रद्दही करण्यात येईल, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

 

पावसासंबंधी इतर बातमी

5 ते 14 ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टीची शक्यता
https://goo.gl/yZ9Z5h