ठाण्यात मिझेल रुबेला लसीकरण मोहीम व्यापक प्रमाणात राबविणार

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क :  

ठाणे, २२ नोव्हेंबर २०१८:

लहान मुलांना होणाऱ्या गोवर या संसर्गजन्य आणि घातक आजाराला प्रतिबंध करण्यासाठी ठाणे शहरात २७ नोव्हेंबर  पासून ‘’मिझेल रुबेला लसीकरण मोहीम’’ राबविण्यात येणार असल्याची माहिती  महापालिका अतिरिक्त आयुक्त(१) राजेंद्र अहिवर यांनी आज  पत्रकार परिषदेत दिली. यावेळी  उप आयुक्त संदीप माळवी वैद्यकिय आरोग्य  अधिकारी डॉ .आर.टी.केंद्रे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

लहान मुलांना होणारा गोवर या संसर्गजन्य आणि घातक आजार आहे.सरकारने सन २०२० पर्यंत गोवर निर्मुलन व रुबेला आजाराचे नियंत्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मिझल रुबेला लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे.

  • या मोहिमेसाठी ठाणे महापालिकेने ५ लाख ८२  हजार ३४९  मुला-मुलींना ही लस देण्याचे उद्दिष्टे ठरविले आहे. एकूण ९९९ शाळांमध्ये ३ लाख ७७ हजार ५२४ मुलांना प्रथम लस देण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित ३५ ते 40 टक्के लाभार्थीचे गोवर लसीकरण अंगणवाडी केंद्र व नियमित लसीकरण केंद्र येथे करण्यात येईल. या लसीकरण मोहिमेंतर्गत सर्व लाभार्थ्यांना गोवर रुबेला लसीचे एक इंजेक्शन दिले जाईल अशी माहिती डॉ.केंद्रे यांनी यावेळी दिली.

 

  • मिझल रुबेला आजारांपासून संरक्षण व्हावे म्हणून ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील मुलांचे या मोहिमे अंतर्गत लसीकरण करण्यात येणार आहे.सदर लसीकरण मोहीम शाळा, अंगणवाडी केंद्र,आरोग्य केंद्रस्तरावर राबविण्यात येणार आहे. ही मोहीम २७ नोव्हेंबर२०१८ ला सुरु होणार असून   असून पाच आठवडे चालणार आहे.महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये पहिल्या दोन ते तीन आठवड्यात लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले आहे.

 

  • ठाणे महापालिकेच्यावतीने मिझेल रुबेला लसीकरण मोहिमेबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. पालिका कार्यक्षेत्रातील खाजगी शाळा तसेच ठामपा शाळेचे सर्व मुख्याध्यापक, नोडल शिक्ष तसेच विविध सेवाभावी संस्था,त्यांचे प्रतिनिधी  यांना या लसीकरण मोहिमेबद्दल  कार्यशाळेच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले आहे.

 

गोवर झाला कि शरीरातील प्रतिकार शक्ती झपाट्याने कमी होते.त्यामुळे मुलांच्या शरीरात विटामिन ए ची कमतरता जाणवते परिमाणी बालकांची दृष्टी जाण्याची भीती असते.या व्यतिरिक्त बालकांना न्युमोनिया,अतिसार,आणि मेंदुज्वरआदी आजार होण्याची शक्यता असते.गोवर रुबेला लसीकरणामुळे या आजाराचे प्रमाण कमी करता येऊ शकते म्हणून सर्व नागरिकांनी आपल्या मुलांना या मोहिमेंतर्गत लसीकरण करावे असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.  

 

===================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • रन फॉर स्वच्छता