मधुमेह नियंत्रित करण्यासाठी ओव्याचा वापर 

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 24 सप्टेंबर 2023
 मधुमेहावरील घरगुती उपचार पध्दतीमध्ये ओव्याचा समावेश केला जातो. ओवा हा भारतीय  स्वयंपाकघरात  हमखास समाविष्ट असणारा पदार्थ आहे.  ओव्याचा वापर मधुमेह कमी करण्यासाठी अनेक पध्दतीने वापरला जातो. जेव्हा जेव्हा फुगण्याची किंवा पोट दुखण्याची समस्या असेल तेव्हा दोन चिमूट ओवा पाण्यासोबत खाण्याचा सल्ला दिला जातो.
आपल्यापैकी अनेकजण आजही हा घरगुती उपाय करत आहेत. चिमूटभर ओवा एक उत्कृष्ट पाचक म्हणून काम करते. ओव्यामध्ये उच्च फायबर, अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ओवा वजन कमी करण्यासाठी देखील वापरला जातो. यासोबतच हे रक्त दाब नियंत्रित करण्यासाठी आणि चयापचय वाढवण्याचे काम करते.
एका संशोधनानुसार की ओवा ऑइल हायपोग्लायसेमिक आहे आणि जर मधुमेहाच्या रुग्णाने त्याचा आहारात समावेश केला तर ओवा शरीरातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतो.

  • पचन आणि पोट निरोगी राहते
ओव्यामध्ये एंजाइम असते जे पोटातील आम्ल सुधारते आणि अपचन, फुगणे आणि गॅसपासून आराम देण्यास मदत करते. ओवा पेप्टिक अल्सर आणि पोट आणि आतड्यांमधील जखमांवर उपचार करण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकतो.
ओव्याचे  पाणी तुम्ही रोज पिऊ शकता. पाण्यात मूठभर ओवा टाका आणि उकळा. मग पाणी प्या, असे केल्याने पोट चांगले राहते, वजन कमी होण्यास मदत होते आणि रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहते.
ओव्याचे पाणी मधुमेही रूग्णांना जेवणानंतर पिण्याचा सल्ला दिला जातो. याचे कारण म्हणजे ओव्यात असलेल्या फायबर मुळे मधुमेह नियंत्रणात राहतो.
ओव्याचे पाणी प्यायल्याने  प्रतिकारशक्तीही वाढण्यास मदत होते.
मधुमेही रुग्ण आपल्या आहारात ओव्याचा तेलाला समावेश करू शकतात मात्र त्यासाठी योग्य वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
========================================================

 ========================================================