GOOD NEWS मोरबे धरण ओव्हरफ्लो

नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली

  •  अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 24 सप्टेंबर 2023

अखेर नवी मुंबईला पाणी पुरवठा करणारे मोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसडूंन वाहू लागले आहे. आज पहाटे 1.30 च्या सुमारास धरणाचे दोन्ही दरवाजे उघडून अतिरिक्त पाणी साठ्य़ाला सोडून देण्यात आले. मोरबे धरण प्रकल्प संपूर्ण 100% भरला असून 88 मीटर ही जलसाठ्याची सर्वोच्च पातळी पार केल्यामुळे नवी मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

यावर्षी मोरबे धरण प्रकल्प क्षेत्रात आजतागायत 3540.00 मि.मि. पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत 190.890 द.ल.घ.मी. पाणी साठा उपलब्ध होऊन मोरबे धरण पूर्ण भरल्याने नवी मुंबई जलसमृध्द झाली आहे.

उत्तम पर्जन्यवृष्टीमुळे मोरबे धरण संपूर्ण क्षमतेने भरले असून गणेशोत्सवामध्ये नवी मुंबईकरांना मिळालेली ही मोठी भेट असल्याचे सांगत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आपला आनंद नवी मुंबईकरांसोबत व्यक्त केला आहे. तसेच आसपासच्या शहरांतील जलस्थिती लक्षात घेता  पिण्याच्या पाण्याचे महत्व लक्षात घेऊन पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करण्याचे आवाहन केले आहे.

यावर्षी समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचा प्रतिदिन 450 द.ल.लि. क्षमतेचा मोरबे धरण प्रकल्प संपूर्ण 100% भरला असून 88 मीटर ही जलसाठ्याची सर्वोच्च पातळी पार केल्याने आज 24 सप्टेंबर रोजी रात्री 1.30 वाजता सांडव्याचे दोन्ही दरवाजे 15 से.मी. उघडण्यात आलेले आहेत व‌ 675 क्युसेक इतका विसर्ग सांडव्यातून सुरु झाला आहे.

========================================================