लघुग्रह बेन्नू चा नमुना पृथ्वीवर

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 1 ऑक्टोबर 2023

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा च्या ओसिरीस- रेक्स या अंतराळयानातून लघुग्रहाचा नमुना पृथ्वीवर आणण्यात आला आहे. 7 वर्षांच्या प्रवासानंतर ओसिरीस- रेक्स हे अंतराळयान पृथ्वीवर परत आले आहे. ओसिरीस- रेक्स हे नासा आणि अॅरिझोना विद्यापीठाचे संयुक्त मिशन आहे ज्याने जगातील तिसरा लघुग्रह नमुना आणला आहे.

लघुग्रह पृथ्वीसाठी धोकादायक असल्याचे म्हटले जाते. ग्रहांच्या निर्मितीच्या प्रक्रियेचे रहस्य या लघुग्रहांमध्ये दडललेले असल्याने अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा या लघुग्रहांचा अभ्यास करत आहे. लघुग्रहांची रचना ग्रहांसारखीच आहे, त्यामुळे त्यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. नासा लघुग्रहांची माहिती गोळा करत आहे. नासाचे ओसिरिस रेक्स हे  यान 24 सप्टेंबर रोजी अंतराळातल्या बन्नू या लघुग्रहाच्या पृष्ठभागावरील खडकांचे नमुने घेऊन पृथ्वीवर परतले आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजून २२ मिनिटांनी या यानाने अमेरिकेच्या उटाह या वाळवंटात सॉफ्ट लँडिंग केले. नासाच्या या मोहिमेची सुरुवात सात वर्षांपूर्वी झाली होती. ओसिरिस रेक्सने जे लघुग्रहाचे नमुने घेतले आहेत ते चार अब्ज वर्षांपूर्वीचे असल्याचे नासाने म्हटले आहे.  हा नमुना तीन वर्षांपूर्वी लघुग्रहाच्या पृष्ठभागावरून घेण्यात आला होता. या नमुन्यांच्या अभ्यासातून जीवसृष्टीची तसेच ग्रहांची निर्मिती कशी झाली याची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

पॅराशूटद्वारे ही स्पेस कॅप्सूल वाळवंटात उतरवण्यात आली. हे कॅप्सूल ध्वनीच्या वेगापेक्षा 35 पट अधिक वेगाने येत असलेल्या पृथ्वीच्या वातावरणाच्या थराला धडकले. वातावरणीय थरावर आदळल्यानंतर ते पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचेले. त्यानंतर 70 मिनिटांच्या आत हे कॅप्सूल नायट्रोजन शुध्दीकरणात ठेवण्यात आले आहे. नायट्रोजन हा वायू बहुतेक रसायनांशी संवाद साधत नाही. आणि कॅप्लूलच्या आत असलेल्या नमुन्यात त्याचा सतत प्रवाह केल्याने वैज्ञानिक विश्लेषणासाठी हे नमुने आहे त्याच परिस्थितीत ठेवण्यासाठी पृथ्वीवरील दूषित पदार्थांशी संपर्क होवू देत नाही.

जगातील तिसरा लघुग्रह नमुना या कॅप्सुल मधून आणण्यात आला आहे. अभ्यास केला जाणारा हा लघुग्रहाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा नमुना असेल, असे सांगण्यात आले आहे. यापूर्वी, जपानच्या अंतराळ संस्थेने गेल्या 13 वर्षांत लघुग्रहांसाठी 2 अशाच मोहिमा राबवल्या होत्या.

बेन्नू लघुग्रह

ओसिरिस रेक्स या अंतराळयानाने बेन्नू नावाच्या लघुग्रहावरून नमुना उचलला आहे. हा लघुग्रह 1999 मध्ये सापडला होता. हा लघुग्रह दर 6 वर्षांनी पृथ्वीजवळून जातो. 22 व्या शतकात पृथ्वीवर धडकण्याची शक्यता 2700 पैकी 1 आहे. ही शक्यता फारच कमी मानली जाते. हा 1600 फुटांचा लघुग्रह आहे. यातून पृथ्वी आणि इतर ग्रहांच्या निर्मिती प्रक्रियेचे रहस्य उघड होऊ शकते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

ओसिरिस रेक्स मोहिम

ओसिरिस रेक्स मोहिम 2016 मध्ये सुरू करण्यात आली होती. हे अंतराळयान 2018 मध्ये बेन्नू लघुग्रहावर पोहोचले. हा लघुग्रह दोन वर्षे फिरत राहिला. त्यानंतर, 20 ऑक्टोबर 2020 रोजी, त्याने लघुग्रहाचा नमुना घेतला. या नमुन्याचे वजन 250 ग्रॅम असल्याचे सांगितले जाते. या आधी आलेल्या दोन नमुन्यांपेक्षा हे प्रमाण जास्त आहे. 2010 मध्ये इटोकावा या लघुग्रहावरून नमुना आणण्यात आला होता. त्यानंतर, 2020 मध्ये, रूग्यू लघुग्रहावरून एक नमुना आणण्यात आला. हा पृथ्वीच्या कक्षेच्या जवळ असणारा उपग्रह आहे. बेन्नू लघुग्रहावरीस नमुन्याचे वजन या दोघांपेक्षा जास्त आहे. बेन्नू उपग्रहाचा नमुना ग्रहांची निर्मीती आणि पृथ्वीवरील जीवसृष्टिला कारणीभूत असलेल्या सेंद्रिय पदार्थ आणि पाण्याचा उगम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याच्या शोधासाठी उपयुक्त ठरणार आहेत.

========================================================

========================================================