नोटबंदी विरोधात रेल्वे स्थानकांवर स्वाक्षरी अभियान

मुंबई कॉंग्रेसच्यावतीने ६२रेल्वे स्थानक परिसरात मोहीम  -निरुपम

मुंबई,16 डिसेंबर 2016 /AV News Bureau:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  ८ नोव्हेंबर रोजी जो नोटबंदी चा निर्णय घेतला होता. त्याला आता १ महिन्यापेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे. या निर्णयामुळे सर्व लोक त्रस्त आहेत. या निर्णयाविरोधात मुंबई काँग्रेसने अनेक ठिकाणी विरोध प्रदर्शन केले. लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘‘नोट पे चर्चा’’ सारखे चर्चात्मक आंदोलन केले. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून आज मुंबईतील ६२ लोकल स्थानकांवर नोटबंदीच्या निर्णयाविरोधात स्वाक्षरी अभियान सुरू करण्यात आले.

सामान्य माणसाला रोख पैश्याची कमतरता भासत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की काळे धन वाल्यांवर चाप बसवण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. नकली नोटांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे.  पण जेवढे काळे धनवाले आहे, त्यांनी आपले धन पांढरे केले आहे.  ATM मध्ये २००० रुपयांच्या नकली नोटा सापडत आहेत. या नोटबंदी पूर्वी सरकारने कोणतीही पूर्वतयारी केलेली नव्हती. त्याचेच हे परिणाम आहेत, असा आरोप मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे.

सरकारने हा निर्णय त्वरीत रद्द करावा अशी आमची मागणी आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना आवाहन आहे की, त्यांनी या स्वाक्षरी अभियानामध्ये सामील व्हावे आणि सरकार विरोधात आपला रोष प्रकट करावा. रागाला दाबून ठेवू नका, व्यक्त करा, अशी भावना निरुपम यांनी व्यक्त केली आहे.