मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या (28 मे) मेगाब्लॉक

मुंबई, 27 मे 2017/AV News Bureau:

रेल्वे मार्गाच्या देखभाल आणि दुरूस्तीसाठी मध्य रेल्वेने उद्या , रविवारी (28 मे रोजी )मेन आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या मेगाब्लॉकच्या काळात दोन्ही मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.

माटुंगा-मुलुंड डाउन फास्ट मार्गावर सकाळी 111.20 ते दुपारी 4.20 पर्यंत.

  • सकाळी 10.58 ते दुपारी 4.03   या काळात ठाण्याहून सुटणाऱ्या अप स्लो मार्गावरील सर्व गाड्या मुलुंड-माटुंगा स्थानकांच्या दरम्यान फास्ट मार्गावर चालविण्यात येतील. परंतु या गाड्यांना मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन स्थानकांवर थांबविण्यात येईल. तसेच माटुंगा स्थानकातून पुन्हा अप स्लो मार्गावर चालविण्यात येईल.
  • अप स्लो मार्गावरील गाड्या नाहूर, कांजुरमार्ग आणि विद्याविहार स्थानकांवर थांबणार नाहीत. त्यामुळे या स्थानकांवरील प्रवाशांना  भांडुप, विक्रोळी आणि कुर्ला रेल्वे स्थानकातून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
  • सकाळी 10.8 ते दुपारी 2.42 या काळात सीएसटीहून सुटणाऱ्या डाऊन फास्ट गाड्या आपल्या नेहमीच्या स्थानकांव्यतिरक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबविण्यात येतील. त्यामुळे या गाड्या 20 मिनिटे उशिराने धावतील.
  • सकाळी 11.22 ते दुपारी 3.28 या काळात ठाण्याहून सुटणाऱ्या फास्ट अप मार्गावरील गाड्या आपल्या नेहमीच्या स्थानकांव्यतिरिक्त मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकांवर थांबविण्यात येतील. त्यामुळे या गाड्या 15 मिनिटे उशिराने धावतील .
  • सकाळी 11 ते दुपारी 5.30 या काळात सीएसटीहून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व स्लो गाड्या 10 मिनिटे उशिराने धावतील.
  • हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
  • सीएसटी –चुनाभट्टी/ वांद्रे डाउन हार्बर सेवा सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 या काळात तसेच चुनाभट्टी/ वांद्रे –सीएसटी अप हार्बर सेवा सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या काळात बंद राहील.
  • सकाळी 11.21 ते दुपारी 4.39 या काळात सीएसटीहून वाशी, बेलापूर, पनवेल साठी सुटणाऱ्या सर्व गाड्या तसेच सकाळी 10.38 ते दुपारी 4.43 या काळात सीएसटीहून वांद्रे, अंधेरीला सुटणाऱ्या गाड्या बंद राहतील.
  • सकाळी
  • सकाळी 9.52 ते दुपारी 3.26 या काळात पनवेल, बेलापूर, वाशीहून सीएसटीकडे जाणाऱ्या अप गाड्या आणि सकाळी 10.44 ते दुपारी 4.13 या काळात वांद्रे, अंधेरीहून सीएसटीकडे जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
  • मेगाब्लॉकच्या काळात हार्बर मार्गावर प्लॉटफॉर्म क्रमांक 8 वरून पनवेल आणि कुर्लादरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.
  • मेगाब्लॉकच्या काळात हार्बरमार्गावरील प्रवाशांना मेन आणि पश्चिम रेल्वे  मार्गावरून सकाळी 10 ते सायंकाळी 6 या काळात प्रवास करण्याची परवानी देण्यात आल्याचे मध्य रेल्वेने कळविले आहे.