भारतात येणार 5G नेटवर्क

‘5Gभारत 2020 साठी उच्चस्तरीय गटाची स्थापना  

नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2017/AV News Bureau: 5G network in india 

‘भारत 5 जी’ या वायरलेस तंत्रज्ञानाच्या उंबरठ्यावर आहे. 5जी तंत्रज्ञानामुळे देशातील औद्योगिक क्षेत्र जागतिक बाजारपेठेशी जोडलं जाईल तसंच ग्राहकांचाही आर्थिक फायदा होईल. जगभरात अनेक देशांनी अशाच गटांची स्थापना केली असून भारतही 5जी तंत्रज्ञान स्पर्धेत सामील झाला आहे. त्यासाठी एका उच्चस्तरीय गटाची स्थापना करण्यात आली आहे.

‘5जी’ भारत 2020 साठी स्थापन करण्यात आलेल्या यागटाचं मुख्य उद्दिष्ट या संदर्भातला दृष्टीकोन तयार करणं आणि कृती योजना आखणे हे असणार आहे.

भारतात ‘5जी’ ची लवकर अंमलबजावणी, जागतिक बाजारपेठेसाठी स्पर्धात्मक उत्पादने निर्मिती, येत्या 5 ते 7 वर्षात भारतीय बाजारपेठेत 50 टक्के तर जागतिक बाजारपेठेत 10 टक्के वाटा मिळवण्याचं लक्ष्य निश्चित करणं आदी या गटाची प्राथमिक उद्दिष्ट असतील.

नेटवर्क जाळ्याची क्षमता विस्तारीत करण्यासाठी ‘5जी’ हा पाया मानला जात आहे. जवळपास प्रत्येक उद्योगात या तंत्रज्ञानाच्या जोडणीच्या शक्तीद्वारे डिजिटल परिवर्तन घडून येत आहे. या तंत्रज्ञानामुळे सकल राष्ट्रीय उत्पादनात वाढ, रोजगार निर्मिती, अर्थव्यवस्थेचे डिजिटायझेशन आदी लाभ होतील. देशातील औद्योगिक क्षेत्र जागतिक बाजारपेठेशी जोडलं जाईल तसंच ग्राहकांचाही आर्थिक फायदा होईल.