मलेरिया, स्वच्छतेच्या जागरासाठी सायकल रॅली

अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई, 25 एप्रिल 2018:

‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत स्वच्छता कॅलेंडरच्या अनुषंगाने एप्रिल महिन्यात रिड्युस, रियुज, रिसायकलिंग या संकल्पनेवर आधारीत विशेष स्वच्छता मोहिमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत 25 एप्रिल या “मलेरिया दिवसाचे’’ औचित्य साधून वाशी येथील शिवाजी चौक येथे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील व आरोग्य समिती सभापती उषा भोईर यांनी मलेरिया पासून बचाव करण्यासाठी विविध उपाय योजनांबाबत माहिती दिली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या हिवताप अधिकारी डॉ. उज्वला ओतुरकर, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे, स्वच्छता निरीक्षक जयश्री आढळ, आरोग्य विभागामधील अधिकारी व कर्मचारी, स्वच्छताग्रही, नागरिक उपस्थित होते.

ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण, प्लास्टिक बंदी व मलेरिया प्रतिबंध या विषयी सायकल रॅली काढून वाशी विभागात जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे उपस्थित नागरिकांना स्वच्छता व कचरा वर्गीकरणाची शपथ देण्यात आली.