नेरुळ व ऐरोली रेल्वे स्थानकांवर कोविड लसीकरण सुरू

  • अविरत वाटचाल न्यूज
  • नवी मुंबई, 11 नोव्हेंबर 2021:

कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणात नवी मुंबई महापालिकेने पहिल्या डोसचे 100 टक्के उद्दीष्ट पूर्ण केल्यानंतर आता  नागरिकांनी दुसरा डोसही वेळेत घ्यावा यासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी नवी मुंबई महापालिकेने  नेरुळ व वाशी या दोन रेल्वे स्थानकांवर विशेष लसीकरण केंद्रे कार्यान्वित केली आहेत. सकाळी 9 ते 5 या वेळेत या लसीकरण केंद्रांवर लस घेता येणार आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने आतापर्यंत 101 लसीकरण केंद्र सुरू केली असून सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही ही केंद्र सुरू असल्याने नागरिकांना लसीकरण उपलब्ध होवू शकले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविताना कोरोना विषाणुची साखळी आहे तेथेच खंडीत करण्यासाठी टेस्टींगवर भर दिला असून महापालिका क्षेत्रातील सर्व रेल्वे स्टेशन्सवर कोविड टेस्टींग केंद्रे सुरु केली आहेत. त्यामध्ये आता नागरिकांना जलद लस संरंक्षित कऱण्यासाठी कोविड लसीकरण केंद्रे सुरु केली असून पहिल्या टप्प्यात नेरुळ व वाशी या दोन रेल्वे स्टेशनवर लसीकरण केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. लवकरच इतरही रेल्वे स्टेशनवर लसीकरण केंद्रे सुरु करण्यात येणार असून नागरिकांनी कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवसांनी अथवा कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस लगेच घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

—————————————————————————————————–