23 एप्रिल पासून रस्ता सुरक्षा मोहीम

अविरत वाटचाल

मुंबई, 21 एप्रिल 2018:

राज्यात रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रस्ते अपघातांमध्ये राज्याचा देशात तिसरा क्रमांक लागतो. रस्ते अपघातांचे हे वाढणारे प्रमाण कमी व्हावे यासाठी जनजागृती करण्यासाठी 23 एप्रिल ते 7 मे यादरम्यान राज्यात रस्ता सुरक्षेची मोहीम होणार आहे. या विशेष मोहिमेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते सह्याद्री  अतिथीगृह येथे होणार आहे.

राज्यात मार्च अखेरपर्यत 3 लाख 28 हजार नोंदणीकृत वाहने आहेत 3 लाख 40 हजार परवानाधारक वाहनचालक आहेत. राज्यातून प्रवास करणारी व राज्याबाहेरील वाहनांची मोठी संख्या आहे. वाहनांची ही मोठी संख्या हे एक मोठे आव्हान आहे.

  • राज्यात एकूण 743 अपघातग्रस्त ठिकाणे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निश्चित करण्यात आले आहेत.
  • 2017 या वर्षात एकूण 35 हजार 853 अपघात झाले.
  • यावर्षात एकूण 12 हजार 264 व्यक्तींचा रस्ते अपघातात मृत झाला तर 32 हजार 128 व्यक्ती गंभीर जखमी झाल्या.

राज्यातील वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र तपासणीसाठी देशातील पहिले स्वयंचलीत चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. राज्यात 35 परिवहन कार्यालयात ब्रेक तपासणी चाचणीची सुविधा उभारण्यात आली  आहे.

राज्यात अपघातोत्तर वैद्यकीय सुविधा पुरविण्यास्तव एकुण 108 ट्रॉमा केअर सेंटर कार्यरत आहेत. तसेच 108 क्रमांकाच्या एकूण 937 ॲम्ब्युलन्स 24 तास कार्यरत आहेत. रस्ता सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या निवृत्त न्यायमूर्ती राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली दिलेल्या सर्व निर्देशांची पूर्तता करण्यात आली आहे. सन 2020 पर्यंतचा राज्याचा रस्ता सुरक्षा कार्य आराखडा अंतीम करण्यात येत आहे.